आरोग्यराज्य

साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत ‘जयपूर फूट’ शिबीर 

वादळवार्ता प्रतिनिधी सातारा

स्व. आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचे स्मरणार्थ कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा आणि साधु वासवाणी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि, १७ जुलै रोजी आर्यांग्ल हॉस्पिटल येथे मफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फुट) बसविण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

 हात, पाय नसल्याऱ्या दिव्यांग बंधू आणि भगिनींना निराश होण्याचे कारण नाही. आता नवीन तंत्रज्ञानामुळे कृत्रिम हात व पाय बसवून पुनः जीवनात उभारी घेता येऊ शकते आणि त्याच उद्देशाने दिव्यांग व्यक्तींसाठी करतावय सोशल ग्रुपने हि सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. रविवार दि.१७ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आर्यांग्ल हॉस्पिटल सातारा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरामध्ये लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

तरी गरजू लोकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.

अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी

दिलावर पत्रेवाले-९३७२१७८२११, संदिप भणगे- ९८२२१८९७८७, चंदन घोडके- ९८८१८९६०१४, महेश यादव- ७०५८०५४४१८, महेंद्र गार्डे- ९८२२६२७९०९, सुहास वहाळकर-९४२०७७२८७३, विजय देशमुख- ९४२३०३२०७५, विलास कासार- ९८५०६०९४२४, जितेंद्र मोहिते- ९५०३२७२४५३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!