१६ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ०७ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
वादळवार्ता/केज
सहा.पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची दंबग कारवाई करत गोवंश जातीचे जनावरे कत्तलखाण्याकडे वाहुन नेणाऱ्या वाहनावर छापा मारुण तब्बल १६ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ०७ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृतात असे कि दिनांक १८.०४.२०२४ रोजी सहा. पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग केज यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक आयशर पासींग क्रमांक एम.एच.०४ जी.सी. ८५२३ यामध्ये गोवंश जातीचे जनावरे भरुन ती कत्तलीसाठी बेकायदेशिर रित्या साळेगावकडुन केज कडे अवैद्य वाहतुक करित आहे अशी माहिती मिळाल्यावरुन सहा. पोलीस अधीक्षक, श्री. कमलेश मीना यांनी पथकातील दिलीप गित्ते, पोलीस नाईक विकास चोपने, अनिल मंदे, चालक पोलीस हवालदार माने यांना सदर वाहन ताब्यात घेवुन कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने वर नमुद पथकातील पोलीस अंमलदार यांनी चिंचोळीमाळी फाटा येथे थांबवुन रात्री १८.३० वाजण्याचे सुमारास वर नमुद वाहन ताब्यात घेतले, वाहनाचे चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सत्तार तांबोली रा. कोकचपिर ता. केज जि.बीड असे सांगीतले तसचे गाडीतील लोकांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सलमान अमजद पठाण, रा. टिपु सुलतान चौक, केज ता. केज जि.बीड (क्लीनर), बाबासाहेब पंढरीनाथ दळवी, रा.दळवी वस्ती केज, सदरच्या वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये ०४ गाई, ०८ कालवड, ०८ गोरं, ०२ हल्या, ०२ जर्सी गाईचे वासरं असे एकुण ६,१७,००० रूपयाचे जनावरे मिळुन व १० लाख रुपये किंमतीचे आयशर जप्त करुन असा एकुण १६,१७,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन अमजद सत्तार तांबोली रा. कोकचपिर ता. केज जि.बीड (चालक), सलमान अमजद पठाण, रा. टिपू सुलतान चौक, केज ता.केज जि.बीड (क्लीनर), बाबासाहेब पंढरीनाथ दळवी, रा.दळवी वस्ती केज (व्यापारी), लायक ईस्माईल खुरेशी, (व्यापारी),बीलाल अजीब खुरेशी,साबेर सत्तार खुरेशी, अ.क्र. ०४ ते ०५ रा अंबाजोगाई जि.बीड, तसेच अजीम नशीब पठाण, रा. रोजामोहल्ला ता. केज जि.बीड, यांचे विरुध्द वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंश जातीचे जनावरे क्रुरतेने निर्दयीपणे क्षमतेपेक्षा जास्त भरुन आयशर टैम्पोमध्ये भरुन त्यांची कत्तल करण्यासाठी घेवुन जात असतांना मिळुन आल्याने वर नमुद आरोपीविरुध्द पोलीस नाईक दिलीप गित्ते यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे केज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना एस. तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कमलेश मीना, सहा. पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांचे आदेशाने पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, विकास चोपने, अशफाक ईनामदार, पोलीस हवालदार मल्लीकार्जुन माने यांचे पथकाने केली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!