आपला बीड जिल्हा

PSI राजेश पाटील यांचे विद्याधन कोचिंग क्लासेस केज येथेल विद्यार्थ्यांना दिले निर्भीड धडे

"विद्यार्थ्यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व घडण्यासाठी धडपडत राहावे."

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त केज शहरातील नामांकित विद्याधन कोचिंग क्लासेस केज येथे विद्यार्थ्यांना केज पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री. राजेश पाटील सर आणि बिट जमादार श्री. टी. आर. सोपने सर यांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास यावर अमूल्य मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी धडपडत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच मुलींनी निर्भीड व्हावे यासाठी प्रेरणादायी धडे दिले.

यावेळी क्लासेचा विद्यार्थी प्रेमातोष अशोक मुळे इ.५ वी याचा अक्षरगंगा स्पर्धा परीक्षेत तालुक्यातुन प्रथम आल्याबद्दल सन्मान केला.

यावेळी क्लासेसचे संचालक, श्री. एम. गिरी सर म्हणाले, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आम्ही नेहमीच नवोपक्रम आयोजित करत असतो.

” यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, केज पोलीस स्टेशनचे बिट जमादार टी. आर. सोपने व श्री. तांबवेश्वर मुलांचे गुरुकुल केजचे संचालक, नेहरकर जी. एम हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्लासेसचे सहाय्यक शिक्षक कसबे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन मुंडे एन. बी यांनी केले. यावेळी क्लासेसचे शिक्षक कर्मचारी तसेच श्रीमती. कोरडे एस. एस यादेखील उपस्थित होत्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!