केज । प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे मांगवडगाव येथील रहिवाशी असणारे शामराव थोरात गुरुजी हे समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचे योगदान विशेषतः ग्रामीण शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय राहिले आहे.त्यांनी नालंदा शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाच्या प्रसारासाठी काम केले आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने त्यांनी कार्यरत राहून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. राजकीय स्तरावरही त्यांनी समाजहितासाठी योगदान दिले.अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या जीवनकार्यावर गौरव ग्रंथ प्रकाशित होत असेल, तर ते एक महत्त्वाचे दस्तऐवजीकरण ठरेल.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि कालकथित शामराव थोरात गुरुजी यांच्या जीवनावर प्रकाश टाळण्यासाठी गौरव समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक मुजमुले सचिव डॉ.ओमप्रकाश नायर व ॲड सचिन थोरात यांनी पुढाकार घेऊन गौरव ग्रंथ प्रकाशीत करण्याचे ठरवले आहे . दिनांक २ मार्च २०२५ वार रविवार रोजी फुलेनगर येथील जे.के. फंक्शन हॉल येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून सदरील प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहान आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!