वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज शहरात निष्काळजीपणे व बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्या वाहन चालका विरुद्ध वाहतूक शाखेने कारवाई केली आहे.
या बाबतची अशी की, दि. १० नोव्हेंबर रोजी केज पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरातील वाहन चालकाने शहरात रस्त्याने भरधाव वेगाने व रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून मानवी जिवीतास धोका निर्माण होईल; अशा पद्धतीने वाहन चालवीत असताना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. पोलिस नाईक आवेज रईसोउद्दीन मोहमंद, शमीम पाशा शाहीन पाशा शेख, महादेव अभिमान बहिरवाळ या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या फिर्यादी वरून शेख सज्जात खुर्शीद, हन्नु धामन चाऊस, आशोक रामिकसन येळवे, अशोक नामदेव बारगजे, एकनाथ ज्ञानोब तांदळे, आमोल बारीकराव सरवदे या पाच जणांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्त वाहन चालकात दहशत पसरली आहे.