वादळवार्ता वार्तांकन – शेख शाकेर
बीड जिल्ह्यातील नेकनुर येथे जिल्हापरिषद शाळेसमोर झाला महाकाय स्वीमींग पुल ; शालेय विद्यार्थ्यांचे अरोग्य धोक्यात
सविस्तर वृत्त असे कि बीड जिल्ह्यातील नेकनुर शाळेसमोर अतिक्रमण धारकांनी नाल्याचें पाणी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात सोडल्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या समोर महाकाय स्वीमीग पुलाचे द्रष्य निर्माण झाले आहे . तसेच शाळेत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थांचें आरोग्य देखील धोक्यात असलेचे चित्र निर्माण झाले आहे . मात्र ग्रामपंचायत प्रशासन व शाळा व्यवस्थापन समितीचे सपशेल दुर्लंक्ष होत असताना दिसत आहे . जर शालेय विद्यार्थ्यांचे अरोग्य धोक्यात आले तर याची जिम्मेदारी कोण घेईल ? तसेच या स्वीमीग पुलातील पाण्याची व्यवस्था होईल का ? असे विविध प्रश्न नेकनुर येथील नागरीकांना पडले आहेत.