आपला बीड जिल्हा

बजरंग सोनवणे यांनी केले मांजराचे जलपूजन

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्याचा शेतकऱ्यांच्या जीवनात हरीत क्रांती घडवून आणणार मांजरा प्रकल्प काठोकाठ भरला आहे. त्याची जलपूजन राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील मांजरा नदीवरील मांजरा धरण हे काठोकाठ भरले असून सकाळी त्याचे दोन दरवाजे उघडले आहेत. सलग तीन वर्षे हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बीड, लातूर, उस्मानाबाद या भागातील ओलिताखाली जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्या निमित्त येडेश्वरीचे संस्थापक चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांनी दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी मांजरा प्रकल्पावर जाऊन जलपूजन केले. यावेळी त्यांचे सोबत बालासाहेब दादा बोराडे, बाळकृष्ण भवर, गुंडाप्पा भुसारी, पिंटु ठोंबरे, भाऊसाहेब गुंड, बालासाहेब गाढवे, इनामदार, मुस्तफा खुरेशी, युनुस शेख, गोपाळ मस्के, जयचंद धायगुडे, मुकूंद कणसे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!