वादळवार्ता – केज
केज शहरात शिवाजन्मोत्सवानिमित्त विश्वशक्ती युवा मंच धारूर रोड यांच्या वतीने शहरात शनिवार दि 18 फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यासाठी भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 75 हुन अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आली.
या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम- कु विदिशा राहुल गायकवाड (रु 2100), द्वितीय-कु श्रेया संजय बचुटे(रु 1100) तर तृतीय पारितोषिक -कु अस्मिता कमलाकर चौरे (रु 751) देण्यात आले. लहान गटात तीनही बक्षीषे विभागून देण्यात आली. लहान गटात प्रथम – कु आरोही काकडे व की इशा गायकवाड (रु 2100 विभागून), द्वितीय-कु आरोही नाईकवाडे व कु सुप्रिया लांब (रु 1100 विभागून) तर तृतीय पारितोषिक – कु अभिज्ञा विलास आवाड व कु अन्वीता तगारे यांना विभागून देण्यात आले. ग्रुप डान्स मध्ये जिपप्राशा मस्साजोग, जि प प्रा शा चंदनसावरगाव आणि साने गुरुजी निवासी विद्यालय यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे पारितोषिक देण्यात आली तर ग्रुप डान्स मध्ये प्रोत्साहन बक्षीस रु तीनशे अक्षरा मोरे व सह कलाकाराच्या ग्रुप डान्सला देण्यात आले.
या कार्यक्रमाला केज येथील प्रतिष्ठित नागरीक तथा नेते गणांची उपस्थिती हाती. हनुमंत भोसले यांनी कार्यक्रमाचे बहरदार संचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सदरील कार्यक्रमाचे आयोजन विश्वशक्ती जयंती अध्यक्ष सुमित तेलंग, दादा मोरे , महेश सत्त्वधर , आशिष तेलंग , हनमंत सत्वधर सह आदि कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!