वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज तालुक्यातील, देवगाव येथील जनतेतून निवडलेल्या महीला सरपंच सुरेखा शिवाजी गायकवाड यांचे पती शिवाजी गायकवाड यांनी गावातील जनते सोबत खोडसाळपणा करत रमाई घरकुल आवास योजनेचा ठराव उशिरा जाणून बुजून केज पंचायत समितीलि दाखल केल्याने आठ घरकुल मंजूर करण्यात आले नसल्याने देवगाव येथील अनुसूचित जातीच्या आठ लोकांवर अन्याय झाल्याने ते हक्काच्या योजनेपासून अलिप्त राहील्याने गावातील नागरिक म्हणू लागले की विक्रम बप्पा आणि रमाकांत बापू तूम्ही विद्यमान सरपंच पतीच्या मनमानी कारभाराला आवर घाला नसता येणा-या जिल्हा परिषद व ग्रामपंचायत गनिवडणुकीत तुम्हाला आम्ही मतदानरुपी फटका दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असे गावातील जनतेतून बोलले जात आहे.
केज तालुक्यातील देवगाव येथील महीला सरपंच सुरेखा शिवाजी गायकवाड यांना जनतेतून निवडून देण्यासाठी अनुसूचित जातीच्या मतदारांनी मताची लिड देऊन निवडून दिल्या पासून सरपंच व त्यांचे पती शिवाजी आण्णा गायकवाड हे देवगावात न राहता सासुरा या गावी राहून गावातील लोकांनी अडचणीच्या वेळी केलेला मोबाईल फोन लावला तर ते फोन न उचलता आपली मनमानी व खोडसळपणा करत आले आहेत. गेल्या साडेचार वर्षात ते सत्तेवर असताना देखील त्यांनी गावातील रोजगार हमीच्या कामावर बोगस मजूरांच्या नावाच्या यादीत सरपंच व रोजगार सेवक यांचे नावे लावून शासनाचा निधी हडप केला होता.२०१९-२० च्या रमाई घरकुल योजनेंतर्गत आईच्या नावाने घरकुल घेऊन ते बांधकाम न करता जुनेच बांधकाम दाखवून घरकुल,शौचालय मजुरीचे पैसे उचलून घेऊन,सोबतच्या इतर घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यास भाग पाडून त्यांचा निधी मिळण्यासाठी खोडा घालता आहे.
काही घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी जागा नसताना त्यांना बोगस जमिनिवरील जागेची पि.टी.आर.तयार करुन दिल्याने गावात काही दिवस तनाव निर्माण होताच पुन्हा त्या बोगस पि.टी.आर ची नोंद वगळून घेतल्या असल्याच्या तक्रारीवरून सतत चर्चेत असलेल्या सरपंच सुरेखा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच अतुल मुंडे,ग्रामपंचायत सदस्या सोनुताई वाघचौरे व ग्रामसेवक धनंजय खामकर यांनी दि.२८ फेब्रवारी २०२२ रोजी ग्रा.प.कार्यालयात अनुसुचीत जातीतील लोकांना २२-२३ या वर्षात रमाई आवास योजनेतून आठ गरजू लाभार्थी यांना लाभ मिळण्यासाठी ठराव घेतला. त्या ठरावात घेतलेल्या एका महीलेच माहेर हे देवगांव आहे पण त्यांचे नाव गावातील कुठल्याच रेकॉर्डला नसतानाही केवळ सरपंच यांच्या घरातील महीला ही नात्याने जवळची आहे.तर दुसरे नाव असलेल्या महीलेच्या पतीच्या नावाने गेल्या पाच वर्षापूर्वी घरकुल आले होते.हे रेकॉर्ड केज पंचायत समितीला आजही आहे.या दोन्हीही महिलांना लाभ द्यायचा म्हणून प्रथम ठरावात नावे घेतली होती ही बोगस नावे वरीष्ठ नेत्यांच्या निदर्शनात येताच त्यांनी या ठरावातील दोन नावे खोडून दुसरी दोन नावे सरपंच ग्रामसेवक यांच्या सहीने घेवून हा ठराव मंजूर झाल्यानंतर सरपंच पती शिवाजी आण्णा गायकवाड यांच्या मनासारखे लाभार्थी घेतले नाहीत.म्हणून हा राग मनात धरून सरपंच पतीने ग्रामसेवक यांना हाताशी धरून आठ लोकांचा रमाई घरकुल ठराव केज पंचायत समितीला जाणीवपूर्वक उशिरा मंजुरीसाठी दाखल केल्याने हे घरकुल ठराव मंजूर झाले नाहीत. सरपंच पतीच्या खोडसळपणामुळे या आठ लोकांवर अन्याय झालेले व गावातील नागरिक म्हणू लागले की विक्रम बप्पा,रमाकांत बापू विद्यमान सरपंच पतीच्या मनमानी कारभाराला आवर घाला नसता येणा-या जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्हाला आम्ही मतदानरुपी फटका दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असे नागरिकांतून बोलले जात आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!