वादळ वार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
केज शहरातील आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी हातात विणा, टाळ, मृदंग,पताका घेऊन वैष्णवांचा मेळा संतांच्या, वारकऱ्यांच्या रुपात विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतून पंढरीची वारी दिंडी काढण्यात आली.
संतांचे आचार-विचार त्याचे संस्कार मानवतेचा संदेश समाजात रुजवण्यासाठी या वारीच्या निमित्ताने शाळेत हा उपक्रम घेण्यात आला.
गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन तेथे विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेण्यात आले. मुख्य पारावर विद्यार्थ्यांनी फेरा धरून मृदंगाच्या, टाळाच्या आणि विण्याच्या सुरमई ध्वनीमध्ये अभंग गायन करून आनंदाचे वातावरण आणि वैष्णवांच्या मेळाव्याचे स्वरूप प्राप्त केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रताप मोरे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जाधव ,शिक्षक वृंदानी नियोजन केले.
दिंडीमध्ये विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या विशेष उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मोरे यांनी शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!