वादळवार्ता – केज
केज नगरपंचायचा स्वच्छता विभाग नेमका केज शहरातील कोणती सच्छता करतो आहे याचा ताळमेळ ना केज शहरातील नागरीकांना आहे ना मुख्याधिकारी श्री. गायकवाड यांना मात्र स्वच्छतेच्या नावाखाली दर महिन्याला लाखो रुपयांचे बिले उचलले जातात हे तितकेच खरे…
याबाबत सविस्तर वृत्त असे कि केज- कळंब रस्त्यावर पाठीमागील सहा दिवसांपासून कळंब रस्त्यावर असणार्या ऑईल मिलच्या समोर एक कुत्रा मरून पडला आहे. तो त्याच जागेवर सडत आहे. मात्र त्याची दुर्गंधी आस-पास रहणार्या तथा रस्त्यावरून ये-जा करणार्या वृद्ध तथा विद्यार्थी तसेच सकाळच्या सत्रात फिरायला , व्यायामासाठी येणार्यांना होत आहे. सदरील जागेवरून जात- येत असताना नागरीकांना, विद्यार्थ्यांना तसेच वयोवृद्धाना नाक दाबुन पळ काढावा लागत आहे.घाई गडबडीत पळावे लागत असल्यामुळे नागरीकांची चांगलीच दमछाक होत असुन. सहा दिवसांन पासुन सडत आसलेल्या कुत्र्याकडे मात्र केज नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले असल्यामुळे दुर्गंधी त्रस्त झालेले नागरिक मात्र नाक दाबुन बेजार झाले आहेत.
यामुळे केज नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला दिसून येत आहे.त्यामुळे केज नगरपंचायतचे मुख्य अधिकारी श्री गायकवाड स्वच्छता विभागाकडे लक्ष देतील का ? झोपी गेलेल्या कर्मचाऱ्यांना जागी करतील का आदि प्रश्न नागरिकांनमध्ये होत आहेत .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!