Uncategorized

रस्त्याने लपतलपत सोयाबीनचे पोते ओरबडत नेणारा तरुण पोलीसांनी पकडला – गुन्हा दाखल

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

केज तालुक्यातील उमरी गावच्या हद्दीमधुन रस्त्याने लपतलपत रात्रीच्या वेळी सोयाबीनचे पोते ओरबडत नेणारा तरुन पोलीसांनी गस्त घालता वेळेस पकडला.

सविस्तर वृत असे कि केज तालुक्यातील उमरी गावच्या हद्दीमध्ये विसावा हॉटेलच्या 100 मिटर पुर्वेस आरोपी सुरेश रमेश पवार वय 20 वर्ष राहणार पारधी वस्ती कोरेगाव हा सोयाबीनचे 30 किलोचे पोते संशयीत रित्या रात्रीच्या वेळेस 9.05 वाजता गस्त घालत असताना रोडच्या कढेने ओढत असताना केज पोलीस ठाण्याचे पीएसआय. राजेश पाटील पोकॉ. महादेव अभिमान बहिरवाळ पोना.सोपने यांना दिसला . त्याला थांबवुन विचारले असता त्याने सोयाबीनचे मालकी हक्काबाबत कोणतेच स्पष्टीकरण दिले नसलेमुळे पोकॉ महादेव अभिमान बहिरवाळ यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाणे येथे गुरन.456/2022 प्रमाणे कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला व त्याचे ताब्यातील अंदाजे 30 किलो सोयाबीनचे पोते प्रती किलो 70 रुपये प्रमाणे 2100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

पुढील तपास सपोनि. शंकर वाघमाडे यांच्या आदेशाने पोना. गित्ते करत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!