आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

भांडण सोडवयला गेले मात्र सोडविणाऱ्यालाच बदडले; अजब दुनियाचा गजब कारभार

वादळवार्ता वार्तांकन – मुबाशिर खतीब

भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तिस चापटाने, लाथा बुक्यांनी, स्टीलच्या पाण्याने मारहान करूण दुःखापत केली गुन्हा दाखल

सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील तांदळ्याचीवाडी येथील राम भगवान तांदळे , पांडुरंग किसन आव्हाड रा. तांदळ्याचीवाडी यांचे एका सोबत दि 25 नोव्हेंबर रोजी सांय 07 वाजता साळेगाव च्या जवळ पुलावरती भांडणे सुरू असताना लक्ष्मण रामचंद्र तांदळे वय 50 वर्ष व्यवसाय शेती रा.तांदळ्याचीवाडी हे भांडन सोडविण्यास गेले असता पांडुरंग किसन आव्हाड याने शिवगाळ करुण चापट, मारून लाथाबुक्याने मारहान केली तर राम भगवान तांदळे याने स्टीलच्या नटबोल्ट खोलयचे पान्ह्याने कपाळावर मारून दुःखापत केली म्हणुन लक्ष्मण रामचंद्र तांदळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात राम भगवान तांदळे व पांडुरंग किसन आव्हाड यांचे विरुद्ध गुरन. 541/2022 कलम 324,323,504,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोना. काळकुटे हे करत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!