वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
मागील महिन्यात अनेक गावाला जाणाऱ्या एस टी बस बंद केल्या आहेत. यामध्ये केज ते पिंपळगाव कोरडेवाडी, केज ते विडा मार्गे आंधळेवाडी, केज सातेफळ मार्गे हदगाव डोका, केज ते धनेगाव, केज ते नांदूर, केज ते येवता काशीदवाडी या गावच्या गाड्या बंद केल्या आहेत तर वरील काही गावाला जाणाऱ्या गाड्याचा वेळ बदल केला आहे. आंबेजोगाई ते बीड सेटल सेवा तीन गाड्या बंद केल्या.

धारूर ते कंळब चार देखील बंद केल्या आहेत आज कंळब डेपोच्या फक्त तीन गाड्या चालू आहेत, धारूर डेपोच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराने विद्यार्थी प्रवासी त्रस्त झाली आहेत. येजा करणाऱ्या प्रवशांना यामुळे आपणास सोसावा लागत आहे सदरील, बंद केलेल्या गाड्या चालू कराव्यात.
केज बस स्थानकामध्ये पार्किंगच्या नावाखाली बस स्टँड मध्ये प्रवाशांना सोडण्यासाठी येजा करणाऱ्या मोटर सायकल फोरव्हीलर गाड्या प्रवाशांना सोडण्यासाठी येतात बस स्थानकात प्रवेश करताच संबंधित टेंडर घेतलेल्या व्यक्तीकडून पैशाची मागणी केली जाते, पार्किंगच्या नियमानुसार नागरिकांनी गाडी त्याच्याकडे पार्क केल्यानंतरच त्याला पावती फोडण्याचा अधिकार आहे, मात्र असे न करता बस स्थानकात प्रवेश करताच संबंधित व्यक्ती गाडीची चावी काढून घेऊन अरेरावीची भाषा करत पैशाची मागणी करून पावती घे असे हुज्जत घालत पैसे गोळा करत आहे,बस स्थानकाला कंपाउंड करून घ्यावा येणारे जाणारे प्रवासी सुरक्षित नाहीत, रात्री अपरात्री नागरिकांना त्रास होतो, बस स्थानकाला संबंधित गुत्तेदाराकडून कंपाउंड करून घ्यावा कंपाऊंड नसल्यामुळे बस स्थानकामध्ये रात्रीच्या वेळी तर शंभर पन्नास कुत्रे तिथं सहवास करत असतात बंद केलेल्या बस तात्काळ सुरू कराव्यात, केज बस स्थानकात होणारी पार्किंगच्या नावाखाली लूट तात्काळ थांबवावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा विभागीय नियंत्रक राज्य परिवहन मंडळ विभाग बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे भाई मोहश गुंड यांनी दिला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!