वादळवार्ता – केज
केज शहरातील अतिक्रमणाचा विळाखा काढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाची भूमिका बदलण्यासाठी अतिक्रमण धारकांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असला तरीही कुठल्याही दबावाला न जुमानता प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीमेवर ठाम आहे. स्वतः हून अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे .
असे असताना केज तहसिलच्या परिसरात असलेल्या विविध दुकानांची माहिती, त्यांनी भरलेला कर , अधिकृत असणाऱ्या दुकानांची माहिती केज तहसिल कार्यालयातुन मागविली असता.धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे केज तहसिलच्या परिसरातील अतिक्रमण हे अधिकृत नसुन अनाधिकृत आहेत. तहसिल परिसरातील दुकानाकरिता कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया राबवली गेली नसुन कोणत्याही प्रकारचा कर घेतला जात नाही अशी माहिती अधिकारातुन माहिती समोर आली आहे .
जर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण प्रशासन उठवणार असेल तर केज तहसिल मधील अतिक्रमणाचे काय ? तेही अतिक्रमण उठणार का ? अशी केजच्या परिसरात चर्चा सुरू आहे ?
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!