वादळवार्ता वार्तांकन – जालना
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या सहमतीने मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांनी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.
या कार्यकारिणीमध्ये भोकरदन तालुक्यातील गोद्री या गावातील तरुण दैनिक पुष्टभुमीचे जिल्हा जालना प्रतिनिधी कणखर आणि निःपक्ष निर्भीड मांडणी करणारे पत्रकार तथा समाजसेवक जावेदखा महेबुबखा पठाण यांची मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहेत.
या निवडीचे अभिनंदन प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी(दैनिक देशोन्नती/टाईम्स अपडेट न्यूज-जालना), प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष शामका चव्हाण(जी नाईन महाराष्ट्र-औरंगाबाद),प्रदेश उपाध्यक्ष रणजीत सिंह ठाकुर (दैनिक सकाळ-वाशिम),प्रदेश उपाध्यक्ष शेख अलीम (दैनिक एकमत- परभणी),प्रदेश उपाध्यक्ष शेख नबी सिपोराकर (मेरीआवाज़ सुनो-जालना),प्रदेश महासचिव व्यंकटेश सूर्यवंशी (सत्ता सूर्य-जालना),प्रदेश सचिव सैय्यद अनवर(नेटवर्क10-औरंगाबाद), प्रदेश संगठन सचिव शेख शकील (दैनिक नवभारत-जळगांव), प्रदेश मिडिया प्रभारी राजेंद्र पारगांवकर(खडकी 24लाईव्ह न्यूज-औरंगाबाद),प्रदेश सहसचिव अमोल चतुर(न्यूज नाईन मराठी-औरंगाबाद),प्रदेश प्रवक्ता संजय कांबळे(तरुण भारत-नांदेड),प्रदेश संरक्षक शेख साजीद(दैनिक जळगांव वृत्त- जळगांव),प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश चव्हाण(दैनिक कळंब नगरी-नांदेड) व नदीम तांबोळी(परभणी) यांनी केले आहेत.
यावेळी मराठवाडा प्रदेश कोषाध्यक्ष जावेद पठाण यांनी सांगितले की पत्रकारावर अन्याय व हल्ला झाल्यास इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन त्याचा विरोध करणार आहे. तसेच पत्रकारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तत्पर आहे.