वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज येथील छञपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित, बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे दिनांक १३ व १४ जुलै रोजी केंद्रीय पातळीवरील नॕक चे मुल्यांकन झाले होते. चेअरमन म्हणुन आसाम विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरु देबाशिष भट्टाचार्यजी व समन्वयक सदस्य तेलंगना येथील प्रोफेसर डॉ.नागज्योती कोरीपेल्ला,व सदस्य म्हणुन वाराणसी येथील आर्य महिला कॉलेजच्या प्राचार्य डॉ.रचना दुबे हे भेट देवुन गेले होते होते .
या राष्ट्रीय समितीने महाविद्यालयातील शैक्षणिक,भौतिक सुविधा ,ग्रंथालय,सर्व कला,वाणिज्य व विज्ञान शाखेअंतर्गत येणाऱ्या विभागांची व प्रशासकीय विभागाची तपासणी केली होती.नुकताच महाविद्यालयास या परिषदेकडून B++ मानांकन प्राप्त असल्याचा इमेल प्राप्त झाला आहे अशी माहिती बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.जी.फावडे यांनी दिली.महाविद्यालयाच्या या यशाबद्धल श्री.छञपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर साहेब यांनी प्राचार्य डॉ.फावडे ,कार्यालयीन अधिक्षक पी.एस.भोसले ,समन्वयक डॉ.संभाजी भंडे, डॉ.नवनाथ काशिद व प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन व स्वागत केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!