वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज पोलिसांनी अवैद्य दारू विक्री, हातभट्टी आणि गावठी दारू संदर्भात एकाच वेळी सहा ठिकाणी धाडी टाकून अवैद्य धंद्या विरुद्ध मोहीम कडक केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी अवैद्य धंद्या विरुद्ध कंबर कसली आहे.
केज पोलीस ठाणे हद्दीतील अवैद्य दारू व हातभट्ट्या या विरुद्ध दि. २२ सप्टेंबर रोजी अगदी सकाळी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्या दोन वेगवेगळ्या पथकाने क्रांतीनगर केज, उमरी आणि चिंचोली माळी येथील सहा ठिकाणी धाडी टाकल्या.
त्या पथकात पोलीस नाईक उमेश आघाव, महादेव बहिरवाळ, संतोष गित्ते, आंनद ईनकर, मेहेत्रे हे सहभागी झाले होते. या कारवायामुळे अवैद्य दारू विक्री आणि गावठी दारू निर्मिती करणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.