अपघातआपला बीड जिल्हाआपले केज
केज जवळ उमरी फाट्यावर भीषण अपघात : रस्ता ओलांडणारी महिला जागीच ठार !

वादळवार्ता – गौतम बचुटे

वादळवार्ता – गौतम बचुटे
केज-बीड रोडवर गंगा माऊली साखर कारखान्या जवळ असलेल्या उमरी फाट्यावर बीड येथील दवाखाण्यातून एका आजारी रुग्णाला घेऊन अंबाजोगाईकडे जाणाऱ्या भरधाव कार क्र. (एम एच-४४/एस/१६४४) ने मंगळवारी दि.२९ रोजी रात्री ८:३० वा. सुमारास रस्ता वैजयंती शिंदे (रा. उमरी पाटी) या रस्ता ओलांडीत असताना त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत वैजयंती शिंदे या जागीच ठार झाल्या. अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी धाव घेत अपघातातील कार ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणण्यात आली. तर मयत महिलेचे पार्थिव उत्तरीय तपासणी आणि शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालया केज येथे पाठवण्यात आले आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.