Uncategorized

केज रोटरी डान्स स्पर्धेत विदीशा गायकवाड ‘आरोही काकडे प्रथम तर चेतना काळे द्वितीय स्थानी

वादळवार्ता वार्तांकन – केज

नवरात्र महोत्सवानिमित्त भवानी मंदिर परिसरात केज रोटरीने आयोजित केलेल्या डान्स स्पर्धेत कु विदिशा गायकवाड व , कु.आरोही काकडे  या दोघींनी प्रथम स्थान पटकावले तर कु चेतना काळे हिने द्वितीय स्थान मिळवले.

या स्पर्धेत तिसरा क्रमांक कु ज्योती नेहरकर व गार्गी गवळी यांना मिळाला. विशेष प्रोत्साहन बक्षिसे कु गार्गी भोयटे व मोरे यांनी पटकावली.

केज रोटरीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण 48 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी अतिशय सुंदर नृत्ये सादर केली.

या स्पर्धेचे परीक्षण रो डी एस साखरे व रो विकास मिरगणे यांनी केले. सूत्रसंचालन रो हनुमंत भोसले व दादा जमाले पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी केज शहरातील कलाप्रेमी युवक-युवती व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेचे बक्षीस वितरण 12 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती केज रोटरीचे अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, सचिव सूर्यकांत चवरे व प्रोजेक्ट चेअरमन हनुमंत भोसले यांनी दिली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण देशपांडे, धनराज पुरी यांच्यासह इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!