Uncategorized

केजमध्ये भरदिवसा घराचे कुलूप तोडून रोख अडीज लाख रुपये तर ७७ हाजाराचे दागिने पळवले ; गुन्हा दाखल

वादळवार्ता / केज 

केज येथील शिक्षक कॉलनीत भरदिवसा अज्ञात चोरट्यानी घराच्या गेट वरून उडी मारून आत प्रवेश करून मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटातील नगदी अडीच लाख रु. आणि सत्त्याहत्तर हजार रु किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीची घटना घडली आहे.

केज येथील शिक्षक कॉलनीत राहणारे दिनकर शिंदे यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. दि. ११ जुलै रोजी माल घेवून उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे गेले होते. तर त्यांची पत्नी घराला खुप लावून त्यांच्या फर्निचरच्या दुकानात गेली होती. मुलगी सिद्धी व मुलगा अभिषेक हे दोघे शाळेत गेली होते. शाळा सुटल्या नंतर दुपारी ३:३० वा. च्या सुमारास मुलगी सिद्धी ही घरी आली तेव्हा तिला घराच्या मुख्य दरवाजाचा कोंडा व कुलूप तोडून घर उघडे असल्याचे दिसले. तिने ही माहिती शेजाऱ्यांच्या फोनवरून आईला दिली आणि त्या नंतर सौ. जयश्री हिने ही माहिती फोन वरून दिनकर शिंदे त्यांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता अज्ञात चोरट्यांनी दिनकर शिंदे यांच्या घराच्या गेटवरून उडी मारून त्यांच्या मुख्य दरवाजाचा कोंडा तोडून दोन बेड रूम मध्ये प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात ठेवलेले नगदी रोख २ लाख ५० हजार रु. आणि ७७ हजार ५०० रु. किंमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण ३ लाख २७ हजार ५०० रु. चा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी दोन दिवसा नंतर म्हणजे दि. १३ जुलै रोजी दिनकर शिंदे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ४१७/२०२३ भा. दं. वि. ३७९ व ४५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लांडगे हे करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!