वादळ वार्ता – केज
केज येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी दर्पण दिन आणि मूकनायक दिना निमित्त पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.
पत्रकारिता क्षेत्रात नवनवे बदल घडत आहेत. मुद्रित पत्रकारिता, द्रुकश्राव्य माध्यम आणि सोशल मिडिया व डिजिटल पत्रकारिता असे क्षेत्र विस्तारत आहे. त्या संबंधी पत्रकारांना माहिती व्हावी यासाठी केज येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर कार्यशाळेचे आयोजन धारूर रोड भवानी चौका लगतच्या मुक्ताई मंगल कार्यालय, पेट्रोल पंपाच्या पाठीमागे केले आहे. या एकदिवसीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सकाळी १०:०० वा. आयबीएन लोकमत या वृत्त वाहिनीचे वृत्त निवेदक विलास बडे तर दुसऱ्या सत्रात जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्रात आकार डिजिटलचे संपादक या विषयावरती प्रभाकर सूर्यवंशी हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या सत्रात मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्रात न्यूजचे संपादक सुशील कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श पत्रकार संघ , सक्रिय पत्रकार संघ, झुंजार पत्रकार संघ , राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ , पुरोगामी पत्रकार संघ , मराठी पत्रकार परिषद डिजिटल पत्रकार संघ , स्वाभीमानी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!