अवैद्यरित्या देशी दारूची वाहतूक करणारे दोघे पंकज कुमावत यांच्या ताब्यात
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
बेकायदेशीरपणे मोटार सायकल वरून दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना पकडून कारवाई केली आहे.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील कारेगव्हान येथे दोन तरुण अवैद्यरित्या दारू विक्री करण्यासाठी मोटार सायकली वरून अवैद्य व चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना एका गुप्त बातमीदाराने दिली. माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी हे अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पोलिस अंमलदार बालाजी दराडे आणि राजू वंजारे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
आदेश मिळताच पोलीस अंमलदार बालाजी दराडे आणि राजू वंजारे यांनी सापळा रचला आणि बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. कारेगव्हाण येथील माऊली फाटा येथे उमेश गोपिकीशन खंदारे आणि बाजीराव गहिनीनाथ खंदारे दोन इसम हे त्यांच्या स्वतःच्या फायद्या करिता देशी दारूचे चार बॉक्स चोरटी विक्री करण्यासाठी मोटर सायकलवरून घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून १४ हजार रु. ची देशी दारू व ६० हजार रु. किमतीची मोटार सायकल असा एकूण ७४ हजार रु किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!