आपला बीड जिल्हा

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांचे केज तालुक्यातील जनतेला अवाहन

वादळवार्ता वार्तांकन – केज

जिल्ह्यात तथा केज तालुक्यात लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरत आहे, या अफवेची पोलिसांनी शहानिशा व सखोल चौकशी केली असता ही अफवा तत्यहीन व खोटी असल्याची खात्री झाली आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे .पोलीस यंत्रणा सतर्क असून या संदर्भातील काही जुने किंवा इतरत्रचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मात्र त्याचा बीडशी काहीही संबंध नाही, असे व्हिडिओ विनाकारण व्हायरल करू नयेत. जर कोणी जाणीवपूर्वक अशी अफवा पसरवत असल्याचे आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, घर, गल्ली, परिसरात कोणीही अनोळखी व्यक्ती, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस ठाणेस त्वरित कळवावे. तसेच कोणीही संशयास्पद समजून कोणत्याही व्यक्तीला मारहाण करू नये, अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये पोलिसांशी संपर्क करावा . असे अवाहन केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!