आपला बीड जिल्हा

दोन पाऊल लोकांनी अन दोन पाऊल ग्रामपंचायतीने पुढं यावे तरच गावचा विकास होईल—भास्करराव पेरे पाटील

स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित आनंदगाव येथे व्याख्यान

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

गावच्या विकासासाठी लोकांनी दोन पाऊल पुढे यावं आणि ग्रामपंचायतीने दोन पाऊल पुढे यावे तरच गावचा विकास शक्य असे मत पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले ते तालुक्यातील आनंदगाव(सा) येथील कर्मक्रमात व्याख्याते म्हणून बोलत होते.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमानिमित्त पाटोदा गावचे आदर्श सरपंच तथा शिल्पकार भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान गुरुवार दि १२ रोजी झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड ,प्रमुख उपस्थिती युसूफवडगाव पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक शेखर औटे, सरपंच गणेश राऊत , शिवाजी पोळ आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले

पैसा हे सर्वश्रेष्ठ नाही. राजकारणातून पैसा कमवायचा या उद्देशाने पुढे येऊ नका. मतदारांनी पैसा घेऊन मतदान करणे महापाप आहे त्यातून गावाच्या पिढ्यान पिढ्या बरबाद होतील. युवकांनो आई-वडिलांची सेवा करा ग्रामपंचायतीचा कर भरला पाहिजे. कर भरल्यानंतर ग्रामपंचायत ने नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. निवडणुकीच्या काळात जात धर्म ,पक्ष ,पार्टी असे कोणतेही कलुशीत मत डोक्यात न ठेवता जो गावाचं भलं करेल अशाच उमेदवाराला मतदारांनी निवडून दिले पाहिजे.

एकमेकांचे मतभेद दूर करून मागे काय झालं हे न पाहता येणाऱ्या पिढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. गावात फळझाडे लावणे आवश्यक आहे.गावात स्वच्छता ठेवली पाहिजे. ती सर्वांची जबाबदारी आहे.असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्तविक डॉ हनुमंत सौदागर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोविंद गायकवाड यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!