आपला बीड जिल्हाआपले केज

जिल्ह्यात 7 नोव्हेंबर चे रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू

वादळवार्ता/बीड

हा महिना सण-उत्सवाचा असून कोणतेही दुदैवी घटना घडू नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहे.

मराठा समाजाचे विविध आंदोलने सद्या बीड जिल्ह्यात सुरु असून, रविवार दिनांक 24.10.2023 रोजी पाटोदा येथे होणारा दसरा मेळावा. यासह जिल्ह्यात त राजकीय हालचाली व घडामोडीमुळे मोर्चे , निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता रोको या सारखे आंदोलने होण्याची शक्यता असून यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करीता कलम ३७(१) (3 ) अन्वये दि. 24.10.2023 चे मध्यरात्री 00.01 वाजेपासून पासून ते रविवार दि. 07.11.2023 चे रात्री 12 वाजेपर्यंत चे काळात बीड जिल्ह्यात कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.

  या कालावधीत काढण्यात येणा-या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील.

शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यां व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास खालील बाबीस मनाई करण्यात आली आहे.

या अन्वये शस्त्र, सोटे ,काठी, तलवार, बंदूक, लाठया, काठया, कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके, दगड, किंवा इतर क्षेपाणस्त्रे, शरीरास इजा होणा-या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडांबनात्मक नकल, सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षिता धोक्यात येईल, किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगू नये.

          जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचणार असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचणारी असेल, व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती,किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन यासाठी मनाई आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही, मिरवणूका मोर्चे काढता येणार नाही.

        कोणताही मोर्चा,सभा, मिरवणूक व तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिका-यांची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील. तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस लागू राहणार नाहीत व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजूरीशिवाय 15 दिवसापेक्षा जास्त मुदतीपर्यंत अमलात राहणार नाही.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!