आपला बीड जिल्हाक्राईम
धारूर हद्दीत पंकज कुमावत यांच्या पथकाची गुटखा व दारुवर कार्यवाही

वादळवार्ता/गौतम बचुटे

वादळवार्ता/गौतम बचुटे
शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, धारूर तालुक्यात अवैद्य दारू आणि अवैद्य गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्या वरून त्यांच्या आदेशाने पथकातील बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गीते, अनिल मंदे, शमीम पाशा व प्रकाश मुंडे यांच्या पोलीस पथकाने गोपाळपूर आणि असोला येथे कारवाई केली. त्यावेळी शिवाजी माणिक माळेकर आणि विष्णू महादेव चोले हे दोघे अवैद्यरित्या चोरटी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या कडून ६ हजार २३० रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच पोलीस पथकाने धारूर बस स्थानक पूर्व बाजूस असलेल्या आकाश ट्रेडर्स नावाचे दुकानात तपास केला असता जयराज मनोहर तिवारी याच्या कडून प्रतिबंधित विमल व राजनिवास गुटखा आणि सुगंधी तंबाखू असा १२ हजार २२२ चा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने हा गुटखा त्याने बीड येथील। व्यापारी आबा मुळे यांच्याकडून विकत घेतला असे सांगितले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.