वादळवार्ता वार्तांकन – माजलगाव
माजलगाव तालुक्यातील /तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार यांची 5 पदे मंजूर असून फक्त एकच नायब तहसीलदार यांचेवर कारभार चालु आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे बीड जिल्हअधिकारी साहेबानी तात्काळ कमीत कमी 2 नायब तहसीलदार यांची पदे भरावीत अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड जिल्हाउपाध्यक्ष ॲड हरिभाऊ घायतिडक यानी निवेदनाद्वारे केलेली आहे .
तहसील कार्यालय माजलगाव येथे नायब तहसीलदार यांची 5 पदे मंजूर असून जानेवारी 22 पासून तहसील कार्यालयाचा कार्यभार फक्त 1 नायब तहसीलदार पहात आहेत .
माजलगाव तालुका हा क्षेत्रफळाने मोठा आहे .माजलगाव तालुक्यात 121 गावे आहेत या प्रत्येक गावातील वेगवेगळे खूप सारे शेतकऱ्यांची शेती संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ट सुद्धा आहेत.
करिता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून तालुक्यातील व्यवहार सुरळीत चालावा यासाठी कमीत कमी 2 नायब तहसीलदार साहेबांची तात्काळ नियुक्ती करावी व सर्वसामान्य जनतेस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अँड घाईतिडक यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!