आपले केजसामाजीक

छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन वाहने सांभाळुन चालवा हो….! 

वादळवार्ता – केज 

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव अवघ्या भारतभर उत्साहात साजरा केला जातो ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणुका निघतात हा जयंती उत्सव अवघ्या कांही दिवसावर येऊन ठेपला आहे मात्र केज शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असणार्‍या चौकाची भयानक अवस्था झालेली आहे .

यास केज नगरपंचायत चा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत आहे . ना कुठले नियोजन ना कुठली अस्मिता त्यातच चौकाच्या शेजारी सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता अर्धवट असल्यामुळे व चौकाच्या बाजुस मोठा खड्डा पडल्यामुळे तसेच रस्त्यावरील लोखंडी गज बाहेर आल्यामुळे टायर मधे घुसून पंक्चर होत आहेत .वाहने जर जोराच्या स्पीडमध्ये असेल तर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे चौकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याबरोबरच चौकामध्ये चारही बाजुने ये जा करणार्यां वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चौकामधुन वाहने सांभाळुन चालवा हो ऽऽऽऽ अशीच म्हणण्याची वेळ केजच्या जनतेवर आली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!