वादळवार्ता – यवतमाळ
राळेगाव तालुका काॅंग्रेस पक्ष व शहराच्या वतीने आज दिनांक 31/5/2023 रोज बुधवारला भाऊसाहेब कोल्हे सभागृहात नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता पंरतु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यानंतर काॅंग्रेस पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे दिनांक 30/5/2023 रोज मंगळवारला पहाटे तीन वाजता दिल्ली येथे निधन झाल्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी समय सुचकता राखून हा सत्कार सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद वाढोणकर यांनी केले.
सोबतच काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले सोबतच मतदारांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.उपस्थित संचालकांचे शब्दसुमनानी स्वागत करून त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काॅग्रेस पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे यांनी केले तर आभार काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी मानले.या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघाचे संचालक, वसंत जिनिंगचे संचालक, तालुक्यातील सर्व संस्थाचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!