Uncategorized

अजूनही प्रामाणिकपणा जिवंत आहे ! भास्कर मस्के यांना सापडलेला टॅब केला परत

वादळवार्ता – गौतम बचुटे

हरवलेल्या वस्तू शक्यतो सापडत नाहीत आणि ती वस्तू ज्यांना सापडलेली ते परत आणून देणे अशा घटना दुर्मिळ असतात परंतु केज येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर मस्के यांनी त्यांना सापडलेला एक महागडा आणि नामांकित ब्रॅंडचा मोबाईल टॅब परत केला.या बाबतची माहिती अशी, की दि. ३ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते आणि रिपाइंचे शहर अध्यक्ष भास्कर मस्के हे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातून त्यांच्या घराकडे जात असताना तहसिल परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालया समोर एक मोबाईल टॅब आढळला. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या एका पांढऱ्या चार चाकी गाडीतील प्रवाशांना हाक मारून तो टॅब पडला असल्याचे सांगितले; मात्र गाडीतील लोकांनी ते ऐकले नाही व ती गाडी निघून गेली. त्या नंतर भास्कर मस्के यांनी तो रस्त्यावर पडलेला टॅब त्यांच्या ताब्यात घेतला. ही माहिती त्यांनी रिपाइंचे तालुका सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे आणि पत्रकार संतोष गालफाडे यांना फोन वरून दिली आणि तो टॅब पोलीसांच्या ताब्यात देण्यासाठी येण्याचे कळविले. त्या नंतर भास्कर मस्के यांनी सदर टॅब केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या स्वाधीन केला. या वेळी गौतम बचुटे व संतोष गालफाडे हे उपस्थित होते. पोलिसांनी सदर टॅब हा मंजुषा बाळासाहेब मस्के यांचा असल्याने ओळख पटवून त्यांचे नातेवाईक महेश राठोड यांच्या स्वाधीन केला. त्या टॅब मध्ये मागील बाजूस ठेवलेले १००० रु. देखील होते.

रिपाइंचे शहराध्यक्ष भास्कर मस्के यांच्या प्रामाणिकपणा बद्दल पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

भास्कर मस्के यांचे पत्रकारांनीही केले कौतुक :- सदर घटना माहीत होताच केज येथील पत्रकार रामदास तपसे, गौतम बचुटे, विनोद शिंदे, दत्तात्रय हंडीबाग, रमेश इतापे, दशरथ चवरे, रमेश गुळभिले, अजय भांगे, नंदकुमार मोरे, रंजित घाडगे, तात्या गवळी, अर्शद शेख, महादेव दळवी यांनी शासकीय विश्राम गृहावर भास्कर मस्के यांचा सत्कार केला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!