Uncategorized

दहिफळ वडमावली येथून दोन मुलीसह विवाहिता बेपत्ता

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथून एक पंचवीस वर्षीय विवाहिता ही तिच्या दोन लहान मुलीसह बेपत्ता झाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दहिफळ वडमाऊली ता. केज येथून दि. ३० सप्टेंबर रोजी सुप्रिया अमोल कांबळे वय २५ वर्ष ही तिच्या दोन मुली कु. समिक्षा अमोल कांबळे वय (८ वर्ष) व कु रिंकू अमोल कांबळे वय (३ वर्ष) यांना सोबत घेऊन सायं काळी ५:०० वा च्या सुमारास तिच्या सासू सासऱ्यांकडे शेतात जाते असे सांगून गेली. मात्र तिचा शोध घेतला असता सुप्रिया आणि तिच्या दोन मुली कु समीक्षा कु रिंकू या आढळून आल्या नाहीत तसेच सर्व नातेवाईकांकडे देखील तपास केला असता त्या मिळून आल्या नाहीत म्हणून दि. ४ ऑक्टोबर रोजी तिचा पती अमोल दिलीप कांबळे यांच्या तक्रारी नुसार त्याची पत्नी व दोन मुली बेपत्ता असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मेसे हे पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या बाबत काही माहिती असल्यास केज पोलिसांशी संपर्क साधावा.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!