वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
महाराष्ट्र शासकाच्या आदेशाप्रमाणे शासकीय कर्मचार्यांनी ज्या ठिकाणी सेवा आहे त्याच ठिकाणी रहाण्याचे आदेशीत केले आहे. मात्र केज महसुल मंडळाच्या अंतर्गत येणारे तलाठी , मंडळ अधिकारी सेवेच्या ठिकाणी न रहाता तालुक्याच्या ठिकाणाहुन ये जा करत आहेत त्यामुळे सज्जाच्या ठिकाणी रहाणारे रहिवाशी तथा विद्यार्थी यांना वेगवेगळे प्रमाणत्र काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये – जा करावी लागते व त्यांचे वेळेवर काम होत नाही .
म्हणुन केज तालुक्याच्या महसुल मंडळाअंतर्गत येत असलेल्या तलाठ्यानी तथा मंडळ अधिकारी यांनी सेवेच्या ठिकाणीच रहावे असे निवेदन एमआयएम चे शहराध्यक्ष तालेब इनामदार यांनी एका तहसिल कार्यालयात दिलेल्या निवेदनावरती मागणी केली आहे.