वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
आज नेहरू युवा केंद्र बीड अंतर्गत स्वच्छ भारत अभियान 1 ऑक्टोबर ते 31ऑक्टोबर पर्यंत सुरु असलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तांबवा ता. केज जिल्हा.बीड येथील जि.प.प्रा.शाळा तांबवा येथील शाळेच्या परिसर स्वच्छ करून स्वच्छ भारत अभियानास सुरुवात केली.
स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमास उपस्थित युवक,जेष्ठ व विद्यार्थी यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दाखवला व कार्यक्रम सुरळीत पणे पार पडला.या वेळी ज्ञानेश्वर शेळके (राष्ट्रीय युवा स्वयंसेवक, केज) म्हणून यांनी स्वच्छते विषयी माहिती दिली.या वेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छते प्रसंगी श्लोक चाटे,काटकर सुदर्शन,सक्षम,साखरे, प्रेम कापरे, राऊत वल्लभ यासह आदि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.