वादळवार्ता – गौतम बचुटे
केज तालुक्यातील उमरी येथील गंगामाऊली साखर कारखाना परिसरातील दोन हातभट्ट्या केज पोलिसांच्या डीबी पथकाने उध्वस्त केल्या.
केज पोलिसांचा डीबी पथकातील पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि त्रिंबक सोपणे याना दि.२२ रोजी एका गुप्त बातमीदार मार्फत अशी माहिती मिळाली की, केज-बीड हायवे नजीकच्या उमरी फाट्या जवळील गंगामाऊली साखर कारखाना परिसरात डोणगाव फाट्या जवळ शिवाजी बाबुराव काळे आणि भिमा बाबुराव काळे हे दोघे गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करीत आहेत. माहिती मिळताच डीबी पथकाचे दिलीप गित्ते आणि त्रिंबक सोपणे यांनी १२:०० वा. च्या सुमारास त्यांनी अचानक छापा मारला. त्यावेळी पोलीसांना पाहुन दारु पिणारे लोक पळुन गेले. त्या ठिकाणी आरोपी शिवाजी बाबुराव काळे आणि भिमा बाबुराव काळे हे दोघे मिळुन आले. त्यांचेकडे तयार दारुचे कॅन्ड आणि गावठी हातभट्टी तयार करण्याचे गुळ व नवसागर मिश्रीत फसफसते रसायान अस ३२ हजार रुपयाचे मुद्देमाल जागीच नष्ट करून हातभट्टी उध्वस्त केली. या प्रकरणी दोन आरोपीवर महाराष्ट्र् दारू बंदी अधिनियम ६५ (ई) नुसार केज।पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. firmy-szydlowiec.pl सोशल नेटवर्क्सवर जाहिरातीबद्दल लिहिते.
डीबी पथकाने ही कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मतदर्शनाखाली केली.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!