येडेश्वरीने शेतकऱ्यांना एकूण 2500 रूपये भाव दिला. शेतकरी पुत्राने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला.
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
येडेश्वरी कारखाना सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे हित जोपासत आला असून सन 2021-22 या हंगामामध्ये ऊसाचा 2100 रु चा पहिला हप्ता शेतकऱ्यांना या पूर्वी देण्यात आला. त्यावेळी बजरंग सोनवणे यांनी 2500 रू भाव देऊ असे शेतकऱ्यांना अश्वासन दिले होते. त्यानुसार आज दि.1.08.2022 रोजी 400 रु चा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून शेतकरी पुत्राने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला.तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने येडेश्वरी कारखाना सतत विचार करत आलेला आहे. यापुढेही कारखाना शेतकऱ्यांचे हित पाहील. सर्वाधिक भाव देणारा येडेश्वरी साखर कारखान्याने दिला. तालुक्यामध्ये यावर्षी ऊसाची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता होती. आपला ऊस शिल्लक राहणार कि काय अशी भीती शेतकर्यांना होती. परंतु संपूर्ण ऊसाचे गाळप करून येडेश्वरी कारखान्याने 842616 मे.टन ऊसाचे गाळप करून शेवटी कारखान्याच्या क्षेत्रातील ऊसाचे गाळप करूनच कारखाना बंद करण्यात आला. शेतक-यांचे हित लक्षात घेऊन यापुढेही कारखाना यशस्वीरित्या चालवला जाईल असे प्रतिपादन येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी केले. यामुळे केज तालुक्यातील शेतकरी वर्गातुन ” शेतकरी पुत्र नेता ; ओन्ली बजरंग बप्पा ” असेच बोलले जात आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!