अप्पर पोलिस अधीक्षक श्री. तिडके मॅडम, सहाय्यक पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांची प्रमुख उपस्थितीपर मार्गदर्शन
दैनिक वादळ वार्ता/केज
केज शहरातील व ग्रामीण भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,शांतता कमिटीचे सदस्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष/पदाधिकारी, श्रीराम नवमी मंडळाचे अध्यक्ष/पदाधिकारी, राजकीय/सामाजिक व्यक्ती, व्यापारी बांधव, पत्रकार बांधव यांना कळविण्यात येते की,दिनांक.०४/०४/२०२४ रोजी ०५ वा.(दुपारी पाच वाजता) पोलीस स्टेशन केज येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, श्रीराम नवमी-२०२४ निमित्त शांतता कमिटी बैठकीचे आयोजन केलेले आहे. सदरील बैठकीसाठी श्रीमती तिडके मॅडम, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई , मा.श्री.कमलेश मीना सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज हे उपस्थित राहून मार्गदर्शन करून सूचना देणार आहेत.
तरी सर्वांनी शांतता कमिटी बैठकसाठी दिनांक.०४/०४/२० २४ रोजी सांय ५ वाजता पोलीस ठाणे केज येथे उपस्थित रहावे असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!