आपला बीड जिल्हाविशेष

माजी आ. पृथ्वीराज साठेंनी साधला कार्यकर्त्याशी संवाद!

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केज शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी संवाद साधून शहरातील व मतदार संघातील समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या.

केज शहरातील शासकीय विश्रामगृहावर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी फुलेनगर, हाउसिंग कॉलनी,समर्थ नगर, क्रांतीनगर, सिद्धार्थ नगर यांनी उमरी येथील तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी युवकांमध्ये जाऊन युवकांच्या समस्या व अडी अडचणी जाणून घेतल्या. आणि त्या अडचणी सोडवणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे सांगितले. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता संघटना बांधणी केली पाहिजे. समाजासाठी आणि अन्यायाच्या विरोधात उभा राहून युवकांनी लढले पाहिजे. जोपर्यंत आपल्या प्रश्नाची उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपला लढा दिला पाहिजे. युवकांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये आपले स्वतःचे उद्योग उभारले पाहिजे. व युवकांनी स्वतःच्या पायावर उभा राहावे यामध्ये कोठे अडीअडचणी आल्या तर मी स्वतः तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी मी अहो रात्र तुमच्यासोबत राहून तुमची सर्वांची कामे मार्गी लावीन असे आव्हान करीत माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी जनतेची कामे करून घेण्यासाठी येणाऱ्या काळात मी तत्पर राहील. व आपण सर्वांनी तुमच्या अडीअडचणी माझ्यापर्यंत पोहोचाव्यात त्या नक्की मी सोडवीन अशी ग्वाही दिली. यावेळी मोठ्या अपेक्षणी मुक्तपणे तरुणांनी लोकांच्या गाडी अडचणी मांडल्या.

तसेच सत्ता नसली तरी मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग आंधळे, विष्णू चाटे, नगरसेवक अझहारोद्दीन शेख, दादासाहेब चाटे राम घुले यांच्यासह तरुण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!