वादळ वार्ता – प्रतिनिधी
मौजे जामगा येथे संत एकनाथ महाराज विकास पॅनलचे घवघवीत यश. निलंगा तालुक्यातील मौजे जामगा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये संत एकनाथ महाराज विकास पॅनलच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले.
मौर्ज जामगा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक सुरूवातीपासूनच चुरशीची ठरली. माजी चेअरमनचे 17 वर्षापासुन असलेले वर्चस्व नवनिर्वाचीत उमेदवारांनी मोडुन काढले व सेवा सहकारी सोसायटी संत एकनाथ विकास पॅनलच्या ताब्यात आली. संत एकनाथ महाराज विकास पॅनलचे 12 पैकी -10 उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले.
या निवडणूकीत निवडून आलेले प्रभाकर संतराम शहापुरे यांची चेअरमन पदी निवड झाली व व्हाईस चेअरमनपदी सुमनबाई अशोक पवार यांची बिनविरोध निवड संचालक मंडळ पदी मनोज रतन पवार, झाली. निवडून आलेले नवनिर्वाचीत मल्लीकार्जुन नमोसे, तानाजी दादाराव पवार, बालाजी वामन पवार, सुरेश मारूती भिंगोले, सुमनबाई बाबुराव पवार, याकुब फजुसाहेब शेख, गंगाराम मशीदा गायकवाड यांची निवड झाली.
या निवडणूकीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे संत एकनाथ महाराज विकास पॅनलतर्फे जाहिर आभार व्यक्त करण्यात आले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!