वादळवार्ता/ केज
केज – तालुक्यातील नराधमाने गाईचे पाय बांधून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा घृणास्पद आणि अमानवीय प्रकार गुरुवारी (दि.३१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी सदरील व्यक्तीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा नराधम आरोपी कोरडेवाडी येथील असून त्याच्याकडे एक गाय आहे. तो गाईला गावाशेजारी असलेल्या गायरान जमिनीत गाय चारण्यास घेऊन जात असतो. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तो गाईला घेऊन गायरान जमिनीतील झाडीत गेला. गाईचे चारही पाय दोरीने बांधून तिला खाली जमिनीवर पाडत तो गाईवर अनैसर्गिक कृत्य करू लागला. तेवढ्यात तेथून शेतात निघालेल्या दोघा ग्रामस्थांना झाडातून गाईचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. त्या ग्रामस्थांनी सदर आरोपीचे मोबाईलमध्ये फोटो काढून त्याला अक्कल आहे का, असे का करतोस म्हणताच आरोपीने उलट त्यांनाच हातपाय तोडण्याची धमकी देत गाय घेऊन निघून गेला. भीतीपोटी त्या दोन ग्रामस्थांनी हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. २ सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार इतर ग्रामस्थांना सांगितल्यानंतर सर्वजण पोलिसात तक्रार देण्यास आले. सदर तक्रारीवरून त्या नराधमावर केज पोलीस ठाण्यात गु.र.न. ५२०/२०२३ कलम ३७७ भादवी व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याचे कलम ११(१)(अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!