
केज । प्रतिनिधी

केज । प्रतिनिधी
गावात रुजू झाल्यापासून त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तितक्याच तत्परतेने सोडवण्याचे कार्य केले आहे. शासकीय योजनांचे लाभ योग्य ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, वेळेत सातबारा, उतारे देणे, शेतकऱ्यांचे पुनरावलोकन प्रकरणे मार्गी लावणे अशी अनेक कामे त्यांनी नियमबद्धपणे केली आहेत.मात्र दुर्दैवाने, काही राजकीय हितसंबंधित व्यक्तींनी केवळ स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी श्रीमती अश्वीनी गुळभिले मॅडम यांच्या विरोधात केज तहसिल कार्यालयात तक्रार दाखल केली. मात्र या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर, गावकऱ्यांनी याचा जोरदार निषेध करत मॅडमच्या पाठीशी उभे राहत तहसिलदारांना दिनांक ०७ जुलै रोजी लेखी निवेदन दिले असुन या निवेदनात, गावकरी, शेतकरी व कष्टकरी जनतेने श्रीमती अश्वीनी गुळभिले मॅडम या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेशी सुसंवाद ठेवून काम करणाऱ्या अधिकारी आहेत, असे ठामपणे नमूद केले. “मॅडमच्या कामामुळे आम्हाला वेळेत सेवा मिळतात, कोणतीही लाच किंवा अडवणूक न करता त्या आपलं काम करतात,” असे गावकऱ्यांचे म्हणणे होते.या घटनेंमुळे एक बाब स्पष्ट होते की, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी समाज उभा राहतो आणि खोट्या आरोपांपुढे सत्याचे समर्थन अधिक बळकट होते. गावकऱ्यांचे हे पाऊल संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायक ठरले आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.