Uncategorized

नेकनूर चे एपीआय मुस्तफा शेख व सहकार्याची कर्तव्य तत्परता चोरीच्या गुन्ह्यातील सव्वा लाखाचे दागिने फिर्यादीस केले परत

वादळवार्ता प्रतिनिधी – शेख शा

 

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील सुलतानपूर येथे अज्ञान चोरट्याने लूटमार करता सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि चोरट्यांना अटक केले होते त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या शहरीच्या गुन्ह्यात एक लाख 29 हजार रुपयांचे दागिने फिर्यादीन सन्मानपूर्वक परत करण्यात आले . बीड तालुक्यातील सुलतानपूर येथे आठ डिसेंबर 2019 रोजी पहाटे अज्ञान चोरट्याने केशरबाई अशोक नाईकवाडे यांच्या घरात घुसून तिथल्या लोकांना मारहाण केली व एक लाख 29 हजार रुपयांचे 37 ग्राम सोन्याचे दागिने लंपास केले होते . या प्रकरणातील नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरट्यांना पकडले होते . या गुन्हाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा यांनी चोरी केलेले सोने हस्तगत केले व न्यायालयाच्या आदेशाने दिनांक 11 जुलै रोजी फिर्यादी केशरबाई अशोक नाईकवाडे व त्यांच्या मुलगा हरिदास अशोक नाईकवाडे यांना एक लाख 29 हजार रुपयाचे दागिने सन्मानपूर्वक परत केले . यावेळी सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख पोलीस उपनिरीक्षक, जाधव व मोरे पोलीस निरीक्षक राख यांच्यासह दोन पंच यावेळी उपस्थित होते .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!