आपला बीड जिल्हाक्राईम

पैशाच्या व्यवहारातून व्यक्तीचे अपहरण !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील आंधळ्याचीवाडी येथून तिघांनी पारधी समाजातील एकाला इसमाचे स्कॉरिओ गाडीतून अपहरण करून पळवून नेले. या प्रकरणी अपहृताच्या पत्नीच्या तक्रारी वरून चौघा विरुद्ध अपहरणाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, शनिवार दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:०० वा. हंगेवाडी ता. केज येथील पारधी समाजातील साहेबराव शिंदे व त्याची पत्नी पुष्पा शिंदे यांना आंधळेवाडी येथील बाबासाहेब किसन आंधळे, बाबासाहेब किसन याचा मुलगा आणि पत्नी यांनी आंधळेवाडी येथील मुंज्याच्या माळावरील धाब्यावर बोलावून पैशाच्या कारणा वरून शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर साहेबराव शिंदे याला एका स्कॉर्पिओ गाडीत बळजबरीने उचलून टाकून अपहरण केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी अपहृत साहेबराव शिंदे यांची पत्नी पुष्पा साहेबराव शिंदे हिच्या तक्रारी वरून बाबासाहेब किसन आंधळे, बाबासाहेब किसन याचा मुलगा आणि पत्नी रा. सर्व आंधळेवाडी ता. केज या चौघा विरुद्ध मारहाण करून अपहरण करणे व जीवे मारण्याची धमकी दिली; म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार उमेश आघाव हे अपहरण प्रकरणाचा तपास करीत आहेत.

दरम्यान ऊसतोडणीच्या व्यवहारातून मुकादम आणि मजूर यांच्यात भांडणे होत असून अपहरण करून मारहाण करणे व खून आत्महत्ये सारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्याना आळा घालणे आवश्यक आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!