वादळवार्ता – केज
केज शहरातील नामांकित इंग्लिश शाळा पवनराजे इंग्लिश स्कूल केज तथा कै. राम चौरे प्रा.मा. उच्च .मा. विद्यालय केज येथे वार्षिक स्नेहसंमेलन पालकांच्या दिग्गज मान्यवरांच्या उपास्थितीत संपन्न झाले.
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन महसुल उप आयुक्त चंद्रकांत वसंत केदार हे होते तर कार्यकमाचे अध्यक्ष म्हणुन राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण , केज विधानसभा माजी आमदार पृथ्वीराज साठे हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन गट शिक्षण अधिकारी सुनिल केंद्रे , गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे , उमेश चौरे , दादासाहेब चाटे , पत्रकार विजय आरकडे , पत्रकार मुबशिर खतीब , पत्रकार महादेव दळवी , पत्रकार रमेश गुळभिले , पत्रकार गौतम बचुटे, पत्रकार रंजित घाडगे , पत्रकार बालासाहेब जाधव , पत्रकार साजेद इनामदार आदि मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव चौरे यांच्या वतीने मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रिन्सिपल अशोक मस्के सर यांनी केले तर तर राजेश्वर चव्हाण ,पृथ्वीराज साठे , सुनिल केंद्रे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने देशभक्ती पर , सांस्कृतिक गितावर, तथा नाटक आशा विविध कला सादर करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.एस.चौरे यांनी तर आभार पिन्सिंपल घुले सर यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!