आपला बीड जिल्हाभ्रष्टाचार

अरणगावची अंगनवाडी कागदावर ,निधी मात्र खिशात ; ऐन स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण!

दोषीवर कडक कारवाई करा ; अन्यथा अरणगावच्या हनुमान मंदिरामध्येच आमरण उपोषण

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

ग्रामीण भागांमध्ये अंगण परिसरात चालवली जाणारी माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी. ह्यात महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ३ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे तसेच माता-बालक ह्यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबीं कडे लक्ष पुरवणे अश्या कार्यांचा समावेश अंगणवाडी मध्ये होतो.

यासाठी विविध स्तरामधुन अंगनवाडी साठी वेगवेगळ्या कामासाठी तथा बांधकाम करण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध होतो .

मात्र ग्रामगाडा ओढणार्‍या स्वार्थी पुढार्‍यामुळे तथा कांही भ्रष्टाचारी कर्मचार्‍यामुळे गावाचा विकास चोरीला जातो.

अशीच परिस्थिती केज तालुक्यातील मौजे अरणगाव येथील अंगनवाडीची आहे.  

सदरील अंगनवाडीचे बांधकाम करण्यासाठी सन २०१५ / २०१६ मध्ये निधी मंजुर झाला होता . सदरील बांधकाम करण्यासाठी ” यश कन्ट्रक्शन ” ला काम देण्यात आले होते. मात्र यश कन्ट्रक्शन ने अरणगाव येथील अंगनवाडीचे बांधकाम न करताच स्थानिक पुढाऱ्यांना तथा कर्मचार्‍यांना हताशी धरून कागदावरतीच अंगनवाडीचे बांधकाम दाखवुन लाखो रुपयांचा निधी उचलल्यामुळे दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी ऐन स्वातंत्र्यादिवशीच मौजे अरणगांव येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा केजचे गटविकास अधिकारी तथा केजचे तहसिलदार दुलाजी मेंढके यांना एका निवेदनाव्दारे देण्यात आला आहे .

सदरील निवेदनावर आश्रुबा शिवाजी भांगे, विकास रामभाऊ राऊत, श्रीराम दत्तु सिरसट , व्यंकट शिवाजी सिरसट, लक्ष्मण नारायण भांगे ,शिवाजी रामकृष्ण सिरसट , महादेव सिताराम ईतापे, विजयकुमार उध्दव भांगे , विशाल रमेश सिरसट, सुंदर दशरथ सिरसट, पोपळे परसराम रामा , आश्रुबा दिलीप इतापे, बाबु इतापे इत्यादींच्या सह्या आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!